वडापूर ता. द. सोलापूर येथे गणेश उत्सवानिमित्त अकलूज येथील कीर्तनकार ह.भ.प. कुमारी ज्ञानेश्वरी घाडगे यांचे समाज प्रबोधन पर कीर्तनाचे आयोजन... - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

वडापूर ता. द. सोलापूर येथे गणेश उत्सवानिमित्त अकलूज येथील कीर्तनकार ह.भ.प. कुमारी ज्ञानेश्वरी घाडगे यांचे समाज प्रबोधन पर कीर्तनाचे आयोजन...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दि. 7 सप्टेंबर 2022 रोजी वडापूर ता. द. सोलापूर येथे मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी चौक येथे गणेश उत्सवानिमित्त मंडळाचे देणगीदार धनंजय सूर्यभान पाटील, सचिन शिवाजी साळुंखे व रामा अशोक कोळी यांच्या देणगीतून अकलूज येथील कीर्तनकार ह.भ. प. कुमारी ज्ञानेश्वरी घाडगे यांचे समाज प्रबोधन पर  कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
   यावेळी प्रथमता मंडळाच्या श्रीची पूजा मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या हस्ते करण्यात आली . श्रींच्या पूजेनंतर कीर्तन कार्यक्रमास रात्री नऊ वाजता सुरुवात झाली व रात्री अकरा वाजता कार्यक्रम संपन्न झाले. 
     यावेळेस मध्यवर्ती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सौरभ वाघचौरे यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व
कीर्तनकार कुमारी ज्ञानेश्वरी घाडगे यांचा फेटा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
    यावेळी या कार्यक्रमास प्रदीप पुजारी, नारायण पाटील, सचिन पाटील, बापू शिंदे, ओम गुंड, शिवाजी कदम, अण्णासाहेब वाघचौरे, दक्षिण सोलापूर राष्ट्रवादीचे नेते सुभाष पाटील, सिद्धार्थ कांबळे, गावचे पोलीस पाटील संभाजी चव्हाण, माऊली गरड, तेजस विजय वाघचौरे, प्रमोद गुंड ,योगेश पवार, धनंजय कदम, नवनाथ पाटील, बाबासाहेब पाटील ,ज्ञानदेव पाटील,बापू उर्फ मारुती शिंदे, दयानंद परीक्षाळे व सर्व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
    या कीर्तनाच्या वेळी कीर्तनकारांना अभंगाची साथ देण्यासाठी तेलगाव,  अंत्रोळी तसेच वडापुरातील सर्व टाळकरी व माळकरी यांनी उपस्थित राहून कीर्तनकार यांना मोलाची साथ दिली आणि या कीर्तनास वडापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads