महाराष्ट्र
यत्नाळ येथे एम.के.फाउंडेशन यांच्या वतीने मोतीबिंदू तपासणी आणि नेत्रदान शिबिराचे आयोजन..
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : गणेशोत्सवानिमित्त एम.के.फाउंडेशन शाखा यत्नाळ यांच्या वतीने मोतीबिंदू तपासणी आणि नेत्रदान शिबिराचे आयोजन केले होते त्यास नागरिकांचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी शिबिराचे उदघाटन वळसंग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आली.
या शिबिरात पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभाग घेतला या शिबीरात 150 लोकांची तपासणी करण्यात आली.
शिबिरास डॉ.मल्लिनाथ मलंग, आणि आरोग्य सेवक डॉ.चाउस यांचे सहकार्य लाभले.
यावेळी एम.के.फाउंडेशनचे संस्थापक महादेवजी कोगनुरे, भाजप तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, अप्पाशा मंदोली,सरपंच सौ. सुनंदा वाघमोडे, उपसरपंच सुनील हिरापुरे, ग्रा.पं. सदस्य राधाकृष्ण बंडगर, तंटामुक्त अध्यक्ष बाबय्या स्वामी, संजय मंदोली,मल्लिकार्जुन कोणदे, रमेश तोरणगी,पोलीस पाटील शिवशरण कोरे, नरसप्पा दिंडोरे, श्रीकांत भरले, अप्पाशा कोगनुरे, महेश हिरापुरे, राजकुमार हिरापुरे, अनेशा तोरणगी, मादय्या स्वामी, गणेश तळळीकर, केदार हिरापुरे,सौ.लक्ष्मी स्वामी, सौ.गुरुबाई मंदोली, श्रीशैल चडचने, सोमनाथ अतनुरे, नागेंद्र कोगनुरे, सुरेश कोणदे,शाखा प्रमुख हणमंत दिंडुरे, मल्लेशी मंदोली, सचिन टेंगळे, भारत तोरणगी, यशवंत डोंगरे, सिद्धाराम टेंगळे, बापू हिरापुरे, योगीराज डंगापुर, दत्ता तळळीकर, कुमार तळळीकर,बसवराज बिराजदार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावित राजकुमार मंदोली यांनी मांडले. सूत्रसंचालन मत्तेखान शेख यांनी तर आभार राधाकृष्ण बंडगर यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment