महाराष्ट्र
बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त सहारा एजन्सी आणि एम एम फाउंडेशन तर्फे गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप व शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार..
समीर शेख प्रतिनिधी
कोल्हापूर : बँक ऑफ इंडियाच्या ११७ व्या वर्धापन दिनानिमित्त एम.एम. शेख फाउंडेशन व सहारा एजन्सी यांच्या वतीने माध्यमिक विदयालय नागाव ता. करवीर येथे ५० गरिब व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप व एन.एम.एम. एस व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालेल्या २५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिससर कोल्हापूरचे मुख्य प्रबंधक विजय भातखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करा यासाठी बँक ऑफ इंडिया नेहमी तुमच्या सोबत राहील असे ते म्हणाले.
तसेच यावेळी माध्यमिक विद्यालय नागावचे मुख्याध्यापक रंगराव तोरस्कर सर यांना एम.एम. शेख फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .
यावेळी बँक ऑफ इंडिया चुये शाखेचे बँक मित्र राजू तोरस्कर यांचा सत्कार करण्यात आला. व राजू तोरस्कर यांनी बँकेच्या कामाविषयी व सचिन चौगले यांनी सहारा एजन्सीच्या कामाबद्दल माहिती सांगितली
या कार्यक्रमास सहारा एजन्सी चे शमशुद्दीन जमादार, जयकुमार मोरे ,दिलीप चौगले ,सचिन चौगले व सर्व शिक्षक स्टाफ, पालक व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या कार्यक्रमास सुत्रसंचालन बाळासाहेब संकपाळ यांनी केले तर प्रास्ताविक अरविंद मगदूम व आभार प्रदर्शन प्रकाश खोत यांनी केले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment