मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर शाळेत "चला पाऊस पेरूया" या उपक्रमांतर्गत सीडबॉल निर्मिती कार्यशाळा संपन्न.. - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर शाळेत "चला पाऊस पेरूया" या उपक्रमांतर्गत सीडबॉल निर्मिती कार्यशाळा संपन्न..


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) :  मंद्रूप ता.द.सोलापूर येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रूप येथे "चला पाऊस पेरूया" या उपक्रमांतर्गत सीडबॉल' निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली.नैसर्गिकरीत्या बीजारोपण होऊन तयार झालेले झाड हे कोणत्याही परिस्थितीत टिकून राहत असते. सीडबॉलच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या बीजारोपण होत असते. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे या पद्धतीची विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी लोकसेवा विद्या मंदिर शाळेत सीडबॉल' निर्मिती कार्यशाळा पार पडली.
     आपल्याकडे पावसाळा आला की वृक्षारोपण करतात त्यासाठी खड्डा, रोप, लागवड अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. शासनाच्या 'झाडे लावा, झाडे जगवा' या योजनेनुसार जागो जागी वृक्ष लावण्यासाठी 'सीडबॉल' ही संकल्पना शेतकरी व गावकऱ्यांना माहिती होण्याकरिता शाळेत विद्यार्थ्यांना सीडबॉल निर्मितीविषयी विज्ञान शिक्षक श्री भुताळसिद्ध गावडे व सौ. वृषाली साबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
   त्याप्रमाणे इ.9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी देखील माती, शेणखत आणि अनेक प्रकारचे बियाणे यांच्यापासून सीडबाॅल (बीज गोळे) निर्मितीचे काम उत्साहात व आनंदात केले. हे सीडबॉल कितीही दिवस साठवून ठेवता येतात. पर्यावरण समतोल साधण्यासाठी याचे मदत होते आणि वृक्षारोपण करण्यास खड्ड्याची अथवा कुठल्याही लागवडीची आवश्यकता नसते. याचा उपयोग शाळेच्या परिसरात आणि रस्त्यांच्या कडेला या बीज गोळ्यांचे रोपण करून 'एक पद ,एक वृक्ष' या योजनेप्रमाणे हरित शाळा, सुंदर शाळा होण्यास मदतच होईल असे म्हणून प्रेरणादायी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
      या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी वर्गशिक्षक विद्यानंद हिरेमठ, राणी आडवीतोटे, सुभाष सुतार, सागर कुंभार, धानप्पा बगले आदींनी परिश्रम घेतले.
     या यशस्वी कार्यशाळेच्या मार्गदर्शकांचे व विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ मंद्रूप चे समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.
    या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील, सचिव तथा माजी सभापती गुरुसिद्ध मामा म्हेत्रे, सहसचिव तथा माजी युवा सरपंच आप्पासाहेब म्हेत्रे, मुख्याध्यापक श्रीधर टेळे, पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार टेळे, ग्रामपंचायत सदस्य बसप्पा घाटे, प्रसाद शेंडगे तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads