जि. प.बांधकाम विभाग प.स. जामनेर उपविभागीय अधिकारी म्हणून मोहन जावळे यांनी स्विकारला पदभार
प्रतिनिधि ... नितीन इंगळे जि. प.बांधकाम विभाग प.स. जामनेर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून मोहन जावळे यांनी आज पदभार स्वीकारला. पंचायत समिती बांधकाम विभागात कार्यलत असलेले श्री मोहन जावळे यांनी आज दी.९ तारखेला ठीक दुपारी ४ वाजता उपविभागीय अधिकारी म्हणूण पदभार स्विकारला असून जामनेर पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी कवडदेवी यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी मोहन जावळे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच जामनेर येथील पत्रकार बांधवांनी सुदधा उपविभागीय अधिकारी यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या स्वागत सत्कार कार्यक्रम ज्योती व्ही. कवडदेवी गटविकास अधिकारी पंचायत समिती जामनेर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन अ.घोडके यांनी केले.यावेळी माजी उपविभागीय अधिकारी जे.के. चव्हाण ,गोपाल व्ही.पाटील, पोपट रा.राणे,निलेश द.राजपूत,प्रेमचंद तिवारी,दिनेश पाटील आदी अभियंता वर्ग तसेच विजय मा.क्षीरसागर,संजीवनी म.पालवे, संतोष वि. ढेकाळे,अंजना पवार सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment