गटविकास अधिकारी यांनी घरोघरी जाऊन केले १००% कोरोना लसीकरण पूर्ण - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

गटविकास अधिकारी यांनी घरोघरी जाऊन केले १००% कोरोना लसीकरण पूर्ण

प्रतिनिधि ... नितीन इंगळे 
जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव डॉ.पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार जामनेर पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी यांनी आज विविध लसीकरण ठिकाणी जाऊन भेटी दिल्या. 
मालदाभाडी येथे ग्रामपंचायत प्रशासन व सरपंच,ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक,जि.प.शिक्षक,अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका,आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांचे मत परिवर्तन करून मालदाभाडी येथे १००% नागरिकांचे लसीकरण पुर्ण करून घेतले.गटविकास अधिकारी यांनी स्वतः घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करून घेल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.पुढील आठवड्यात सर्व ग्रामपंचायती मार्फत अशीच मोहीम राबविण्यात येईल असे ग्रामविस्तार अधिकारी अशोक पालवे यांनी सांगितले. सदर प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील,डॉ.पंकज माळी,के.बी.अण्णा पाटील,आरोग्य सेवक इंगळे,आरोग्य सेविका बडगुजर, आरोग्यसहाय्यीका मोरे सिस्टर अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांची उपस्तीती होती.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads