जामनेरातील भुसावळ चौफुली बनलाय नागरीकांच्या अपघाताचा सापळा
प्रतिनिधि ... नितीन इंगळे जामनेर जळगांव रोड रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने वाहणे जात असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे भुसावळ चौफुली येथे वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी गतीरोधक बसविण्याची मागणी जामनेर येथील नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे भुसावळ चौफुली परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून जळगांव रोड महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्यावर सतत वर्दळ असते. शाळकरी विद्यार्थी, खासगी क्लासेसचे विद्यार्थी हे देखील या रस्त्याचा उपयोग करतात. या रस्त्याला लागूण पंचायत समिति शाळेकडे जाणारा रस्ता, भुसावळ कडे जाणारा रस्ता येऊन मिळतात. परंतु सतत वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर कोठेही गतीरोधक टाकण्यात आले नाही. त्यामुळे वाहनचालक वेगाने चालत असून दररोज येथे उपरस्ते येऊन मिळत असलेल्या चौकामध्ये अपघात होतात. येथील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करुन तातडीने रस्त्यावर ठिकठिकाणी गतीरोधक टाकण्यात यावेत, अशी मागणी जामनेर येथील नागरिक करीत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment