वाकी खुर्द ग्रामपंचायत येथे संविधान दीन साजरा - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

वाकी खुर्द ग्रामपंचायत येथे संविधान दीन साजरा

प्रतिनिधि .. नितीन इंगळे                                          जामनेर तालुक्यातील वाकी खुर्द गावातील ग्रामपंचायत येथे संविधान दिन साजरा करण्यात आला असून 26/11रोजी झालेल्या शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली.
सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवर श्री सुधाकर गंगाराम सुरवाडे यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले.
सरपंच श्री सुधाकर सुरवाडे यांनी संविधानाचे महत्व आपल्या साध्या आणि सोप्या भाषेत केले असता संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो .व याच प्रमाणे सरपंच श्री सुधाकर सुरवाडे यांनी कोविड 19 लसीकरणाचे आदेश देऊन येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये संपूर्ण गावातील नागरिकांना देण्यात येणार आहे असे आवाहन केले.
व 26/11रोजी झालेल्या शहिदांना स्मरण दिवस म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली दिली.
या ठिकाणी सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे, उपसरपंच पुनम योगेश ढाकरे,ग्रामसेवक राजू पुंडलिक बोडखे,सदस्य ईश्वर बाबुलाल तेली,अंबादास जगन नरवाडे, बापु लक्ष्मण पाटील,कविता संदीप झलवार,आरती शिवाजी तेली,शिपाई अजय झुंबरलाल तेली प्रदिप जिवनलाल सरताळे व आदी पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामस्थ व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहून संविधान दिन साजरा करण्यात आला.

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads