जंगीपुरा गावात कोवीड लसीकरणाचा पहीला डोस ९९ टक्के पूर्ण .. संविधान दीन उत्साहात साजरा - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

जंगीपुरा गावात कोवीड लसीकरणाचा पहीला डोस ९९ टक्के पूर्ण .. संविधान दीन उत्साहात साजरा

 प्रतिनिधि .. नितीन इंगळे                                          ग्रामपंचायत कार्यालय जंगीपूरा  व जि.प. शाळा जंगीपूरा यांच्या संयुक्त विदयमानाने संविधान दिन साजरा करण्यात आला  जामनेर तालुक्यातील जंगीपूरा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला असून या मध्ये लोकनियुक्त सरपंच यांनी अशी घोषणा केली की कोवीड १९ अंतर्गत पहीला डोस ९९ टक्के पूर्ण झाला आहे अशी घोषणा ग्रामपंचायत सदस्य , अंगवाडी सेविका , आरोग्य सेवक  , ग्रामसेवक , सर्व ग्रामपंचायत टीम यांनी मोलाची कामगिरी केली  तालुक्यातील जंगीपूरा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला असून जंगीपूरा गावात जि.प. शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विदयार्थ्यांचे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती  प्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती रेखाबाई राजपूत ( उपसरपंच ) यांच्या हस्ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अपर्ण करूण पुजन करण्यात आले नंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले सुत्रसंचालन श्रीमती मिनाक्षी बारबद मॅडम यांनी केले प्रास्ताविक श्रीमती सुजाता सुरवाडे मॅडम ( मुख्याध्यापक ) यांनी केले तसेच श्री एस आर निकम (से. नि.दुय्यम निबंधक ) यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते शिक्षक ,पालक व ग्रामस्थ यांना संविधानाचा परिचय करूण देऊन संविधानिक मूल्ये , मुलभूत हक्क , कर्तव्य व जवाबदाऱ्या , संविधान आणि शिक्षण इ.विषयावर सविस्तर प्रबोधन केले , मुलींची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली जंगीपूरा गावात लसीकरणाचा पहीला डोस  ९९ टक्के पूर्ण झाला आहे उपस्थित आशा वर्कर सीमा राजपूत , सरपंच मॅडम, उपसरपंच मॅडम , सदस्य व ग्रामसेवक यांचा ग्रॉमस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला गावातील बहूसंख्य नागरीक कार्यक्रमाला उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads