धक्कादायक ...जामनेर शहारात कॉन्ट्रॅक्टरदार कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली लाखो रुपयाची केली फसवणूक
प्रतिनिधि ... नितीन इंगळे जामनेर तालुकयातील केकत निंभोरा येथील कॉन्ट्रॅक्टदार तुषार पाटील यानी कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली लाखो रुपयाची फसवणूक केली आहे जामनेर येथील राहुल चव्हान यांनी दि. २९ रोजी ठीक १ वाजता पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार उघडकीस केला आहे केकत निंभोरा येथील कॉन्ट्रॅक्ट दार यानी राहुल चव्हान यांच्या भावाची कॉन्ट्रॅक्ट
च्या नावाखाली अठ्ठठयाहत्तर लाख पन्नास हजार रूपयाची फसवणूक केली असून वारंवार राहुल चव्हान यांच्या भावाला खोटे नाटे लेखी करूण घेतलेली रक्कम या दिवशी देतो त्या दीवशी देतो असे सांगूण राहुल चव्हान यांच्या भावाची दिशाभूल करत होता राहुल चव्हान यांच्या भावाने कंटाळून आमदार गिरीष महाजन यांना हा प्रकार सांगितला आमदार गिरीष महाजन यांनी कॉन्ट्रॅक्टदार ला बोलावून विचारपूस करूण त्याच्या कडून नोटरी करूण घेतली की या तारखेला राहुल चव्हान यांच्या भावाची घेतलेली रक्कम परत कर कॉन्टॅक्टदार यानी मी घेतलेली रक्कम परत करतो असे लिहुन दिले त्या प्रमाणे राहुल चव्हान यांच्या भावानी ठरलेल्या तारखे प्रमाणे कॉन्ट्रक्टदार याला संपर्क केला वारंवार संपर्क करुण तुषार पाटील फोन कट करत होता संध्याकाळी परत राहुल चव्हान यांच्या भावानी तुषार पाटील याला कॉल करूण रक्कम परत कर असे बोलल्यावर तुषार पाटील यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली जे होईल ते करा असे सांगूण फोन कट केला व जीवे ठार मारण्याची धमकी दीली राहुल चव्हान यांच्या भावानी घरी जाऊन हा प्रकार चिठ्ठी वर लिहून घर सोडून कुठे गेला आहे हे कोणाला माहीती नाही आहे गेल्या पाच दिवसा पासून बेपत्ता आहे नेमक राहुल चव्हान यांचा भाऊ कुठे गेला की त्याच कोणी काही बरे वाईट केल हे अजून कळालेल नाही जामनेर पोलिस स्टेशन ला मिसिंग म्हणूण नोंद करण्यात आली आहे जामनेर पोलिस राहुल चव्हान यांच्या भावाचा शोध घेत आहे तुषार पाटील यांनी भरपूर लोकांना नामांकीत व्यक्तीचे नाव सांगूण तुमचे कामे करूण देतो असे सांगूण लोकांची फसवणूक करतो असे पत्रकार परिषद मध्ये राहुल चव्हान बोलत होते प्रमोद खामानकर हा नोटरी मधील साक्षीदार व सहकारी यांनी पळासखेडा केकत निंभोरा वर नेरी पर्यंत अमोल चव्हाण यास शोधण्यास सुरुवात केली असता असता वापस जामनेर येत असताना केकत निंभोरा रस्त्यापुढील पीर बाबा दर्गा जवळ तुषार पुंडलीक पाटील व त्यांच्या सहकार्यांनी प्रमोद खामनकर याच्या टू व्हीलर ला धडक देऊन खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्यांनी जबर मार दिला.असून प्रमोद खामंनकर याला जीवे ठार मारण्याचा देखील प्रयत्न केला आहे. त्यास राहुल चव्हाण यांनी जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले आहे.
प्रमोद खामंनकर याने तसा जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिल्या त्याचप्रमाणे तुषार पुंडलिक पाटील कॉन्ट्रॅक्टर यांनी आमच्यावर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला असून कॉन्ट्रॅक्टर चा खोटारडेपणा समोर आणावा अशा प्रतिक्रिया राहुल चव्हाण यांनी दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment