शाळा सुरू एसटी बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

शाळा सुरू एसटी बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान



 प्रतिनिधि .. नितीन इंगळे
 तळेगाव ता. जामनेर ता.१५ दिवाळीनंतर दिनांक ११ नोव्हेंबर पासुन शाळा सुरू झाले आहेत.  परंतु कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे लाल परीची चाके जागीच थांबली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .तसेच इतर प्रवाशांना देखील खासगी वाहनाची वाट धरावी  लागली आहे. मागील काही दिवसापासून एस टी  कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपामुळे एसटीची सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. या आंदोलनाचा फटका ११नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी  यांना बसला आहे. ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्रात एस टी बस बंद असल्यामुळे शाळेपर्यंत पोहोचण्यास अनेक विद्यार्थ्यांना अडचणीला तोड द्यावे लागत  आहेत. तर काही विद्यार्थी खासगी वाहनाने शाळेपर्यंत पोहोचलेले आहे.वास्तविक पाहता मानवविकास बसेसच्या माध्यमातून आणि मुली या शहरातील विविध विविध विद्यालयात येत असतात. परंतु एसटी बस बंद असल्याने त्यांना ही मोठी अडचण झाली आहे. एकंदरीत या बंदचा फटका  शाळांना बसला आहे तरी महाराष्ट्र शासन यांनी  एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून किंवा सल्लामसलत करून लवकरात लवकर एसटी बसेस सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads