प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.बच्चूभाऊ कडू यांचा जळगांव जिल्हा दौरा!जामनेरला घेणार कार्यकर्ते त्यांची कॉर्नर भेट!!
महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार बच्चुभाऊ कडू हे उद्या दिनांक १६ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत .चाळीसगाव येथे त्यांचा एक कार्यक्रम होणार आहे. त्या निमित्ताने त्यांची जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांची कॉर्नर भेट होणार आहे. दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता बोदवड चौफुलीवर जामनेर तालुका प्रहार जनशक्ती कार्यकर्त्यांशी आमदार बच्चुभाऊ कडू चर्चा करणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप गायके यांनी दिली.
अकोला येथून सकाळी चाळीसगावला येण्यासाठी त्यांचे मोटारीने प्रयाण होणार आहे. मध्यंतरी ते मलकापूर नांदुरा, बोदवड, जामनेर , पाचोरा, भडगाव याठिकाणी कार्यकर्त्यांच्या धावत्या भेटी घेणार आहेत .अडीअडचणी समजून घेणार आहेत जामनेर येथे बोदवड चौफुलीवर दिनांक १६ रोजी सकाळी दहा वाजता नामदार बच्चुभाऊ कडू यांची कॉर्नर भेट आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या भेटीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या तालुक्यातील सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जामनेर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गायके, विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोजकुमार महाले शहर अध्यक्ष वसंता माळी आणि युवक प्रहार जनशक्ती तालुकाध्यक्ष मयुर पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख जीवन सपकाळ यांनी केले आहे त्यांच्यासोबत उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री .अनिलभाऊ चौधरी हेही उपस्थित राहणार आहेत. जामनेर तालुक्यातील जनतेने त्यांच्या अडीअडचणी आसल्यास तसे अडचणींचे लेखी निवेदन नामदार बच्चुभाऊ कडू यांना देण्यासाठी घेऊन यावे ,असेही आवाहन यावेळी जामनेर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment