रस्त्याचे काम गंगापूरी पर्यंत पूर्ण .... नागरीकांमध्ये उत्साव आनंद प्रसंन्न
जामनेरहून भुसावळ कडे जातांना गंगापुरी या गावापर्यंत रस्त्याची अवस्था बिकट झालेली होती यामुळे या रस्त्यावरून दिवस रात्र वापरणाऱ्या दुचाकी स्वार, तसेच चारचाकी वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत होती.सणासुदीच्या काळात कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये सर्वांना आनंद प्रसन्न उपभोगता यावा हा उदात्त हेतू डोळ्या समोर ठेऊन जामनेर येथील स्थानिक ठेकेदारानी काम हाती घेऊन कामाला सुरुवात केली आहे.अवघ्या दोन ते तीन दिवसात निम्म्याहून अधिक रस्त्याचे काम पूर्ण केलेले असून आहे.आपल्या कामाला वेग दिल्याने रस्त्याचे काम पूर्णत्वास केले आहे.रस्त्याच्या झालेल्या कामामुळे जामनेर ते भुसावळ कडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अत्यंत सोईस्कर झाल्याने वाहन धांरकामध्ये एक आंनद निर्माण दिसून येत आहे स्थानिक ठेेकेदाराने लवकर काम चालू केल्याने ठेकेदाराचे नागरीकांमध्ये कौतुक सर्वत्र केले जात आहे
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment