जामनेर पोलिस निरीक्षक अॅक्शन मोडमध्ये.....
प्रतिनिधि .... नितीन इंगळे जामनेर येथील पोलिस निरीक्षक अॅक्शन मोड वर आल्यावर वाहन धारकांचे धाबे दणाणले आहे गेल्या आठ दीवसा अगोदर जामनेर पोलिस निरीक्षक कीरण शिंदे यांनी आव्हान केले होते बिना नंबर प्लेट वाहन आढळल्यास वाहन धारकांवर कार्यवाही करण्यात येईल आज दि .२० रोजी जामनेर येथे नगर परिषद समोर स्वःता पोलिस निरीक्षक कीरण शिंदे व पोलिस टीम घेऊन बिना नंबर प्लेट वाहन धारकांवर कार्यवाही करण्यात आली आहे जामनेर येथील नागरीकांना आव्हान करण्यात येत आहे बिना नंबर प्लेट वाहन फीरवू नका आढल्यास वाहन धारकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल शहरामध्ये मोटरवाहन व वाहतूक नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे बुधवार पासून शहरातील विविध भागात पोलिस प्रशासनाच्या वतीने मोहिम राबवून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस निरीक्षक कीरण शिंदे यांनी दिला होता जामनेर शहरात मोटार वाहन , वाहतुकीचे 2 नियम मोडणारे वाहन धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे . यामध्ये प्रामुख्याने वाहनावर नंबर नसणे , वाहनाची नोंदणी न करता वाहन वापरणे , मोटरसायकलवर ट्रिपलसिट जाणे , वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे , राँग साईड वाहन चालविणे , सीट बेल्ट न वापरने या बाबी आढळुन येत आहेत . तसेच रॉयल इनफिल्ड ( बुलेट ) कंपनीचे मुळ सायलेंसर अनाधिकृतपणे बदलुन मोठ्या आवाजाचे सायलेंसर लावलेले आढळुन येत आहे त्यामुळे जेष्ठ नागरिकांना , महिला , गरोदर माता , लहान मुले आदी नागरिकांना या कर्नकर्शश आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे . वरील सर्व प्रकारच्या बेशिस्त व मोटार वाहन कायद्याने घालुन दिलेले नियम मोडणाऱ्या वाहन धारकावर पोलिस निरीक्षक कीरण शिंदे यांनी अत्यंत कडक कार्यवाही करण्याबाबत वाहतुक पोलिस यांना सुचना दिल्या आहेत . त्यावरून वरील प्रमाणे नियम मोडणाऱ्या वाहन धारकांवर कार्यवाही सुरू केली आहे नवीन मोटार वाहन कायदा व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांनी आपल्या वाहनावर मागे व पुढे स्पष्ट दिसेल असा नंबर टाकावा तसेच नंबर प्लेटवर टाकलेली नावे व इतर मजकुर तात्काळ काढुन टाकण्यात यावा मोटार सायकलवर ट्रिपल सिट जावु नये वाहन चालविण्याचा परवाना सोबत बाळगावा वाहन धारकांनी मोबाईलमध्ये वाहनाची कागदपत्रे ठेवले तरी ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत जामनेर शहरात आज पासून वरील नियम मोडणाऱ्या वाहनावर दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक कीरण शिंदे यांनी दिला आहे
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment