पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा-श्रद्धेय श्री श्याम चैतन्य जी महाराज - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा-श्रद्धेय श्री श्याम चैतन्य जी महाराज

प्रतिनिधि .. नितीन इंगळे                                            तेजोमय दिपातून संस्काराचा दिवा घेऊन संस्कारशील पिढी घडवली पाहिजे आणि त्या पिढीने संस्कारशील भारत निर्माण केला पाहिजे हा उदात्त हेतू दिवाळीच्या सणाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला सांगितला जातो, आणि ह्याच अनुषंगाने गुरुदेव सेवाश्रम मध्ये दिनांक ५/११/२०२१ वार-शुक्रवार रोजी "मेरी दिवाली बच्चो वाली"या सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले! यावेळी बोलताना श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी सांगितले की "पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगावा आणि हा अभिमान बाळगत असताना आपल्या संस्कृतीचं आदान-प्रदान हे पुढच्या पिढीला देण्यात यावे" या विषयीचे विचार श्री. श्याम चैतन्य जी महाराज यांनी मांडले यावेळी श्री विजय पाटील, श्री पुकराज पवार, अंजू पवार व शीतल पाटील यांनी मार्गदर्शन केले हे उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads