शेगाव येथे आदिवासी कोळी जमात अधिवेशन समाज बांधवाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावेः- कवी विनोद जाधव
तळेगांव ..जामनेर तालुक्यात कोळी समाजाचे शेगाव येथे आदिवासी जमात अधिवेशन दिनांक ०७ नोव्हेंबर वार रविवार रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्या अधिवेशन बाबतीत प्रचार व प्रसार करताना आदिवासी संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष कवी विनोद जाधव सर कवी डॉ. अशोक कौतिक कोळीसर , विनोद कोळी (पत्रकार) , शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, डॉ. अनिल सोनवणे, विनोद सोनवणे, दिनेश वाघ,दिनेश तायडे,बबन कोळी,उमेश कोळी,सुरेश पाडळसे, शांताराम जाधव (पत्रकार) तळेगाव ,रमेश सोनवणे, सावन कोळी,संतोष जोहरे,आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नेरी माळ पिंपरी पाळधी शेंदुर्णी मेणगाव गोंडखेल देवपिंपरी तळेगाव कुंभारी टाकळी कापुसवाडी रांजनी व इतर गावामध्ये जाऊन जमात बांधवांना पत्रके वाटप करण्यात आले.तालुक्यातुन मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव अधिवेशन साठी उपस्थित राहावे अंस आव्हान जिल्हा उपाध्यक्ष कवी विनोद जाधव यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment