तळेगावात घाणीचे साम्राज्य नागरीकांचे आरोग्य धोक्यात नागरीकांच्या तक्रारींची दखल घेणार का प्रशासन - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

तळेगावात घाणीचे साम्राज्य नागरीकांचे आरोग्य धोक्यात नागरीकांच्या तक्रारींची दखल घेणार का प्रशासन

प्रतिनिधी .. नितीन इंगळे                                             जामनेर तळेगांवातील संपूर्ण नाल्या (गटारे) घाण पाण्याने तुबल्या असून काही ठिकाणी नालीच्या वर पाणी जात आहे. आणि पानांची बसकी टाकीच्या नळ्याचे पाणी ही रस्ता वर येत आहे. त्यामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याबाबत नागरिकांनी सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा याकडे ग्रामपंचायत चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.जनतेच्या आरोग्याशी खेळ मांडल्याचे दिसून येत आहे. तक्रार करून एक (1) महिना लोटला मात्र अजूनपर्यंत नाली सफाई ला व पानांच्या टाकीचे नळ्याचे पाणी व्यवस्थित गटार मध्ये काढायला मुहूर्त न मिळाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालीत घाण पाणी साचल्याने डासांचे उगमस्थान निर्माण होऊन विविध साथीच्या आजाराला आमंत्रण ठरत आहे. गटारे घाणीने तुडुंब भरल्याने काही ठिकाणी नालीच्या वर पाणी वाहत आणि टाकीच्या नळ्याचे ही पाणी वाहत रस्त्यावर येत आहे. यामुळे लहान मुलांना हगवण, उलटी यासारखे आजार होण्याची दाट शक्यता आहे. असे असताना वारंवार स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्यानंतरही नालीची सफाई व टाकीच्या नळाच्या पानांची व्यवस्था होत नसल्याने सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक यांची कुंभकर्णी झोप उघडेल का असा नाराजीचा सूर जनतेत उमटताना दिसून येत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads