पत्रकारांच्या आंदोलनाचा दणका......... वडवणी तालुक्यात बँकेच्या दोन नव्या शाखा सुरू होणार
वडवणी : प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी एखादा विषय हाती घेतला की, त्यात यश येथेच येते याचा अनुभव आता पुन्हा एकदा आला आहे.. वडवणी आणि देवडी येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी या मागणीसाठी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वडवणी येथील पत्रकारांनी उपोषण केले होते.. ते यशस्वी होत असून दोन्ही ठिकाणी बँक सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे..
स्टेट बँक ऑफ इंडिया या बीडच्या लिड बँकेने वडवणीच्या तहसिलदारांना तातडीने फोन करून बँकेचा पस्ताव पाठविण्याची सूचना केली होती.. त्यानुसार तहसिलदारांनी आजच्या आज लिड बँकेकडे प्रस्ताव पाठविला असून तालुक्यात बँकेच्या दोन शाखा सुरू करण्याची विनंती केली आहे..
तत्पुर्वी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शाखेच्या वतीने सर्व पत्रकारांनी तहसिलसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते.. त्यानंतर एस.एम.देशमुख यांनी केंद़ीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड याच्याशी संपर्क साधून त्यांना वडवणी तालुक्यात बँकेच्या शाखा सुरू करण्याची विनंती केली होती.. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडेही निवेदने पाठविण्यात आली होती.. त्याची शासकीय पातळीवर तातडीने दखल घेण्यात आली असून तालुक्यात किमान दोन बँका सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे..
कोट...
एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आनंद
तालुक्यात दोन नवीन बँका सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची बातमी समजताच एस.एम.देशमुख यांनी आनंद व्यक्त केला आहे.. दोन शाखा सुरू झाल्यास जनतेची गैरसोय कमी होईल, सामान्यांचा वेळ आणि पैसा वाचेल आणि तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.. पत्रकारांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घेत कार्यवाही सुरू केल्याबद्दल देशमुख यांनी सरकारला धन्यवाद दिले आहेत.. तसेच पत्रकारांच्या मागणी पाठिंबा दिल्याबद्दल तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांना देखील एस.एम.देशमुख, संपादक अनिल वाघमारे, वडवणीचे अध्यक्ष विनायक जाधव यांनी एका प़सिध्दी पत्रकाव्दारे धन्यवाद दिले आहेत..
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment