हिवरखेडा बु येथील अवैध धंदे भ्रमणध्वनीवर घेतले जातात मटक्याचे आकडे व दिली जाते देशी दारू व गावठी दारू चे फुगे घर पोह..... - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

हिवरखेडा बु येथील अवैध धंदे भ्रमणध्वनीवर घेतले जातात मटक्याचे आकडे व दिली जाते देशी दारू व गावठी दारू चे फुगे घर पोह.....

    जामनेर तालुका प्रतिनिधि नितीन इंगळे

जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु गावात सट्टा, पत्ता, जुगार, गावठी व देशी दारुची विक्री सह अवैधधंदे राजरोसपणे मोठ्या प्रमाणात सुरु होते. म्हणून हिवरखेडा बु गावच्या महिला व पुरुषांनी याबाबत नाराजी व्यक्त करत हे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत म्हणून जामनेर पोलिस स्टेशनला कळवले होते . हिवरखेडा बु ग्रामस्थांच्या तक्रारीची  दखल घेत जामनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री. किरण शिंदे उपनिरीक्षक कीशोर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सतत धाडसत्र राबवून अवैधधंदे करणारांना सळो की पळो करुन सोडले होते म्हणून अवैधधंदे करणारे यांचे धाबे दणाणले....
या पोलिस कारवाईने दिवसाढवळ्या चालणारे अवैधधंदे बंद झाल्याने ग्रामस्थांनी जामनेर पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले होते. परंतु आता अवैधधंदे करणारांनी नामी शक्कल लढवली असून भ्रमणध्वनीवर (मोबाईल) व्दारे मटक्याचे (सट्याचे) आकडे घेणास सुरुवात केली असून गल्लीबोळात फिरुन चालता, फिरता सट्टा बेटिंगचा फंडा सुरु केला आहे.
तसेच गावठी व देशी दारुची अवैधरित्या विक्री करणारेही भ्रमणध्वनीवर संवाद साधून घरपोच गावठी दारुचा फुगा किंवा देशी दारूच्या बाटल्या विकत असल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे. 
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads