जामनेर कपाशीचा ट्रक झाला पलटी ...१ जण जागीच ठार बाकीचे ८ जण दवाखान्यात उपचारासाठी भर्ती - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

जामनेर कपाशीचा ट्रक झाला पलटी ...१ जण जागीच ठार बाकीचे ८ जण दवाखान्यात उपचारासाठी भर्ती

     जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे                       जामनेर .आज दि.१६ रोजी सुमारे दुपारी १ वाजता      जामनेर - जळगांव रोडवर  सोनबर्डी जवळ कपाशी ट्रक चा  भीषण अपघात घडला सध्या शेतकऱ्यांचा कापुस विक्रीला निघत असून कापुस व्यापारी हे मजुरांना घेऊन कापुस खरेदीला आप - आपले वाहने घेऊन सदर शेतकऱ्यांकडे जात असतात .दुपारी एक वाजेच्या सुमारास जामनेर एक ट्रक एम एच 28 बी 9754 मजुरांना घेऊन निघाला होता.जामनेर - जळगांव रोडवरील सोनबर्डी जवळ कापसाने भरलेला ट्रक पलटी झाला. अपघातात समाधान भगवान साबळे वय ६० रा. जामनेर पुरा , जामनेर येथील रहिवाशी असून हे जागीच ठार झाले.तसेच फिरोज खान नवाब खान वय ४० रा.जामनेर पुरा ,अनिल नामदेव कापसे वय ४०,युवराज सीताराम कोकरे वय ५५, आकाश रामसिंग राजपूत  वय २४, गोपाल विष्णु सोनवणे वय   ४०   , प्रकाश शामराव  माळी वय ४०, विलास भवन चौरे वय ५४ रा. टाकळी खु. ता.जामनेर दत्तात्रय शालिग्राम चौधरी वय ५४ रा. टाकळी खु. ता. जामनेर हे सर्व जख्मी झाले असून यांना  उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे दाखल करण्यात आले आहे अपघाताची नोंद जामनेर पोलिस स्टेशन ला करण्यात आली आहे 
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads