तोंडापूर गावातील तीन कपाशी चोर पकडले .... पहुर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे जामनेर तालुक्यातील तोंडापूर गावात अनिल कांतीलाल कोटेचा यांचे तोंडापूर जामनेर रोड वर कपाशीचे गोडाउन आहे गोडाउनमध्ये अंदाजे २६ ते २७ क्विंटल कपाशी ठेवली गेली होती व तिथे गुरांचा गोठा सुदधा आहे दि .१५ ऑक्टोंबर रोजी नयन कोटेचा हे रात्री साडे नऊ वाजता गोडावून वर गेले व गुरांना चारा पाणी वैगेरे देऊन गोडाऊन ला कडी कूलूप लावून घरी परत गेले दि .१६ ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नयन गुरांचे दुध काढण्यासाठी वाडयात गेले असता गोडाऊनचा दरवाजा त्यांना उघडा दिसला त्यांनी आत जाऊन पाहीले असता सुमारे ४ क्विंटल कपाशी अंदाजे २४००० हजार कींमतीचे कपाशी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नयन चे चुलत भाऊ कल्पेश कोटेचा राहणार तोंडापूर यांनी सदरचा प्रकार नयन यांना सांगितला की तुझ्या गोडाऊन जवळ सागर फकीरा मगरे रा. तोंडापूर हा रात्री १२ वाजेच्या सुमारास गोडाऊन जवळ फीर तांना दिसला होता कल्पेश च्या माहीती द्वारे नयन यांनी सागर मगरे चा शोध घेतला असता तो तोंडापूर गावात फत्तेपूर रोडला हातात कपाशी ची भरलेली युरीयाची पिशवी घेऊन जातांना दिसला नयन यांनी त्याला हटकले असता तो घाबरूण पळून जाऊ लागला म्हणूण नयन यांनी नागरीकांच्या सहाय्याने त्यास पकडण्यात आले व त्याची चौकशी केली व त्याने कबुली दिली कपाशी तुमच्या गोडाऊन मधील च आहे नागरीकांनी त्याला विचारले की उर्वरीत कपाशी कोठे आहे अशी विचारणा केली असता त्याने सांगितले की माझ्या सोबत पंकज भारत लोखंडे ,ईबा मुस्सा तांबोली दोन्ही रा. तोंडापूर हे देखील चोरी करतांना माझ्या सोबत होते आम्ही तिघांनी तुमच्या गोडाऊन मधून कपाशी चोरी केली आहे . नागरीकांनी वेळेचा विलंब न करता तीघांना पकडून पहूर पोलीस स्टेशन ला जमा केले आहे तीघांवर भादवी कलम ४६१ , ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सफौ . अनिल सुरवाडे करीत आहे
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment