धरणगाव येथील रथ उत्सव पूजा-आरती उत्साहात साजरी
अश्विन शुद्ध एकादशी या दिवशी निघणारा रथोत्सव मागील वर्षी प्रमाणे या वर्षीदेखील स्थगित केला आहे. रथउत्सवाची परंपरा अखंड चालू राहावी म्हणून रथाची यथासांग पूजा केली गेली. श्री बालाजी भगवानांना रथावर विराजमान करण्यात आले धरणगांवचे श्रध्दास्थान श्री बालाजी महाराज मंदिर येथे रथ पुजन मा. नामदार गुलाबराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रा, डि, आर, पाटील, उपाध्यक्ष भाऊसो गुलाबरावजी वाघ, जिणोध्दार समिती अध्यक्ष जिवन आप्पा बयस, नगराध्यक्ष निलेश चौधरी, तहसीलदार नितिन देवरे साहेब, पिआय शेळके साहेब, धानोरा चे सरपंच भगवान महाजन उपनगराध्यक्ष विलास महाजन विलासनाना येवले, शाम भाटिया यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक व विविध राजकीय मान्यवर पदाधिकारी तसेच मंडळाचे पंच उपस्थिति होते
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment