महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पाळधीनगरीत शिवसेनेकडून जंगी स्वागत
पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना. गुलाबराव पाटील सिल्वाहासा येथे प्रचार दौऱ्यानिमित्त असल्यामुळे आमदार रोहित पवार यांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.
पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्नेह व मार्गदर्शन नेहमीच लाभत राहते असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. मंत्रीमहोदयांनी जळगावला आल्यावर घरी येण्याचे निमंत्रण त्यांनी दिलेले होते. यानिमित्ताने आमदार रोहित पवार यांनी पाळधी येथे भेट दिली व भाऊसो गुलाबराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथील विद्यार्थ्यांशी आमदार रोहित पवार यांनी संवाद साधला.याप्रसंगी मा.विक्रमजी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक डी डी कंखरे सर, इंग्लिश मीडियम स्कूल चे सचिन पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे योगेश करंदीकर सर,तसेच मुकुंद नन्नवरे माजी सभापती, पाळधी गावाचे सरपंच प्रकाश नाना पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, विजू बापू पाटील, चंदन कळमकर, अनिल पंडित, प्रशांत झवर, अनिल माळी, समाधान वाघ, मच्छिंद्र साळुंखे, चंदू पवार, रवींद्र मानकरी, किशोर पाटील,डॉ व्ही डी पाटील, चंदू पवार ,योगेश सोनवणे, सोनू माळी, सोनू फुलपगारे, जिपीएस स्कुलचे सर्व कर्मचारी व शिवसैनिक उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment