रा. काँ.नेते आ. रोहीत पवार यांनी रस्त्यावरील हातगाडीवर बसुन घेतला चहा वडापाव चा आस्वाद - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

रा. काँ.नेते आ. रोहीत पवार यांनी रस्त्यावरील हातगाडीवर बसुन घेतला चहा वडापाव चा आस्वाद

जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे
दि .२२ जामनेर सकाळच्या सुमारास आमदार रोहीत पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर जात असून त्यांचे विविध ठिकाणी असलेल्या कार्यक्रमाना ते भेटी साठी आले आहेत सकाळच्या सुमारास जळगाव कडे जात असता जामनेरात धावता दौरा केला 
रस्त्यावरील कडेला लावण्यात  आलेल्या जय भोले वडापाव सेंटर  व चहा गाडीवरील चहा वडापाव  स्वाद घेतला भुसावळ चौफुली जवळ त्यांचा फुल गुच्छ देऊन फटाके फोडून स्वागत सत्कार करण्यात आले असून जामनेर शहरातील पदाधिकारी यांच्याशी विविध चर्चा करुण समस्या  जाणूण घेतल्या तसेच जामनेर येथील  पत्रकार व  प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप गायके  यांनी आमदार रोहीत पवार यांची भेट घेतली. यावेळी आमदार रोहीत पवार यांनी सायकलींचे फायदे तसेच रोज किती चालतात ? याची प्रदीप गायके यांना विचारपूस केली तसेच राजकीय ,सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा या विषयावरही चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे नेते संजयदादा गरुड, युवा तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील सेल जिल्हाध्यक्ष ॲड.ज्ञानेश्वर बोरसे, विधानसभा क्षेत्र प्रमुख  किशोर पाटील, ओबीसी सेल शहराध्यक्ष प्रभू झाल्टे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads