निराधारांना तीन महिन्यांपासून सरकारचा आधारच नाही, लाभार्थी झिजवताहेत बँकेच्या पायऱ्या - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

निराधारांना तीन महिन्यांपासून सरकारचा आधारच नाही, लाभार्थी झिजवताहेत बँकेच्या पायऱ्या

 जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे                जामनेर दि. १२ .निराधार नागरिक सर्वप्रथम बँकेत  जावून अनुदान बँक खात्यात जमा झाले का? अशी विचारणा करीत आहेत. अनुदान अजूनपर्यंत बँक खात्यात जमा झाले नाही, असे सांगितले जाते.निराधार व्यक्तींना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा मोठा आधार आहे. परंतु, हे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. कोरोना संकटकाळात निराधारांच्या अनुदानाला ब्रेक लागल्याने लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.निराधार नागरिकांना आधार म्हणून शासनाकडून निराधारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना आदींचा समावेश आहे. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असणाऱ्या निराधार व्यक्तींना या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य देण्यात येते. ६५ वर्षाहून अधिक वय असणारे वृद्ध, निराधार पुरूष, दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुले असणाऱ्या निराधार व आर्थिकदृष्टया असमर्थ, विधवा स्त्री, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लाभार्थी आदींना या योजनेचा लाभ मिळतो परंतू गेल्या तीन महीनाभरा पासून ऐक रुपया सुदधा योजनेचा जमा झालेला नाही गोरगरीब जनता आशेवर 
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads