रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता,नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत... भुसावळ शहर खड्यांच माहेर घर - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता,नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत... भुसावळ शहर खड्यांच माहेर घर

जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे                     भुसावळ नाहटा चौफुली ते रेल्वे स्टेशन या मार्गावरील  रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे डांबरही निघाले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यातील खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नाहटा चौफुली खडका चौफुली रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे डांबरही निघाले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम दर वेळेस करण्यात येते, आणिप्रत्येकवेळी रस्ते पुन्हा नादुरुस्त होतात. या मार्गावरून आंतरराज्यीय वाहतूक होते.  राज्यातून जड वाहनांची नेहमीच ये-जा सुरू असल्याने डांबर उखडून खड्डे निर्माण होत आहेत. या मार्गाने माल वाहून नेणारे ट्रक सतत जात असतात. मात्र निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्योन रस्ते सतत उखडतात आणि गढ्ढे तयार होतात. त्यामुळे प्रवासी वाहने, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना आपला जीव धोक्‍यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे. जड वाहतूक दिवस रात्र सुरू राहिल्याने या मार्गावर मोठमोठे खड्डे पडून डांबर निघून गिट्टी बाहेर आली आहे त्यामुळे या मार्गावरील जाताना दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमीच धोका असतो. म्हणून त्वरित शासनाने दखल घेऊन या रस्त्याची दुरूस्ती करून मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads