पाळधी गावात कापुस ट्रकवरून उतरतांना विजेचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर पाळधी गावात आज दि .13 वार बुधवार रोजी दुपारी 12 वाजता कापूस भरण्यासाठी व्यापारी ट्रक वाहन क्रमांक MH 19 Z 0890 हे गावातील कापूस भरण्यासाठी नाचणखेडा रोड वरील परदेशी मंगल कार्यालयाजवळ आले असता ट्रकच्या टपावर बसलेले तीनजण ट्रकवरून खाली उतरत असताना त्यांना विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने विजेचा जबर शॉक लागला. यामधे माळपिंप्री येथील विशाल नाना श्रीखंडे वय 23 हा युवक जागीच मरण पावला असून त्याच्या सोबतचे ज्ञानेश्वर भोजने व ज्ञानेश्वर काळे या दोघांना देखील विजेचा शॉक लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
सदरील घटनेची माहिती पहूर पोलिस स्टेशन मध्ये मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, पो.हे.कॉ. अनिल राठोड, पो. हे. कॉ. प्रदीप चौधरी यांनी घटनस्थळी जाऊन पाहणी करून मयत झालेल्या युवकाला जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमोर्टेम साठी हलविण्यात आले तर इतर दोघांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले.सदरील घटनेची अजून पर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment