हिवरखेडा बु येथील रस्ते व गटारी ची दुरवस्था पाहून मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील व प्रहार युवा तालुकाध्यक्ष मयूर पाटील यांनी गटारी काढून वेधलं ग्रामस्थांचे लक्ष
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे
हिवरखेडा बु ता जामनेर दि 17सप्टेंबर रोजी हिवरखेडा येथील रहिवासी यांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडून नागरी सुविधा यावर लक्ष केंदित करण्यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते
सविस्तर वृत्त असे की सन 1985 पासून एन ये झालेल्या नवीन गावठाण परिसरातील नागरी वस्तीत आजपोवत कोणत्याही नागरी सुविधा झाल्या नसल्याने आज पर्यंत 35 वर्षाचा पाढा च पंचायत समितीच्या दालनात मांडण्यात आला होता ,सरपंच तथा ग्रामसेवक यांनी 4 वेळा रस्त्याची लांबी रुंदी मोजून देखील कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्षात गटारी व रस्ते काँग्रेटिकरण करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे , सदरील रस्त्यावर पावसाच्या पाण्याने ठीक ठिकाणी डबके तुंबलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने अनेक नागरिका चे आरोग्य धोक्यात आले आहे , याच मुद्याला धरून हिवरखेडा येथील गट न 132 मधील नागरिकांनी पंचायत समितीच्या दालनात आपल्या नागरी सुविधेचा पाढा वाचला होता व गटविकास अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले होते व त्याच प्रणाने गट न 132 मध्ये तात्काळ मुरुम व गटारी व रस्ते दुरुस्ती न झाल्यास समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत हिवरखेडा यास कुलूप ठोकणार आहे असा ग्रामस्थांकडून निर्वाणी चा इशारा देखील देण्यात आला होता मात्र काही दिवसात तात्काळ एक ब्रास खडी उभारण्यात आली मात्र काम पुन्हा थांबल्याने आज मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील व प्रहार चे युवा तालुकाध्यक्ष मयूर पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन गटारी व रस्त्याची पाहणी केली असता तुंबलेल्या गटारी पाहताच मनसे चे अशोक पाटील व प्रहार चे मयूर पाटील व टीम ने फावडे हातात घेऊन स्वतः गटारीतील घाण काढून ग्रामस्थांचे लक्ष वेधले व सदरील काम येत्या आठवड्यात मार्गी न लागल्यास मनसे व प्रहार पंचायत समितीच्या दालनात ठिय्या मांडणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे यावेळी मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील ,मनसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील , प्रहार युवा तालुकाध्यक्ष मयूर पाटील , प्रहार सरचिटणीस भूषण कानळजे , राहूल रॉय मुळे , हिवरखेडा येथील ग्रामस्थ बाळू पाटील ,नाना पाटील ,प्रकाश पाटील आदी उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment