कृषि क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

कृषि क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान

 नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाअंतर्गत मौजे हिवरखेडे बु  तालुका जामनेर येथे महिला किसान दिन साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित कृषि सहाय्यक पहुर येथील किशोर पाटील यांनी पोकरा योजना,गटाकरीता मिळणाऱ्या योजनाविषयी मार्गदर्शन केले.तसेच तुषाल पाटील समन्वयक पाणी फाऊंडेशन यांनी बांबू लागवड विषयी चर्चा केली. सदर कार्यक्रमास गावाचे  सरपंच देविदास दशरथ जोहरे,अनिल पाटील सदस्य ग्रा.प,प्रमोद पाटील,कृषि सहाय्यक शरद सुरळकर, समुह सहाय्यक रुपेश बिऱ्हाडे, कृषि ताई कविता पाटील तसेच ग्राम कृषि संजिवनी समिती सदस्य,महीला बचत गट सदस्य यांच्या सर्वांच्या उपस्थितीत महिला कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर सुपेकर यांनी केले तर रुपेश बिऱ्हाडे यांनी आभार मानले.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads