अपघातग्रस्त शेतकर्याच्या मदतीला धावले पालकमंत्री
दि.२५ . सर्वसामान्यांच्या सेवेसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे सातत्याने प्रयत्नशील असतात रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या शेतकर्याला ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ मदत केल्याची घटना आज घडली असून.याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे आज दुपारी दापोरा येथून उमाळ्याकडे जात होते. याप्रसंगी त्यांना रस्त्यावर अपघातात जखमी झालेला व्यक्ती रस्त्यावर पडून मदत साठी आरडा ओरडा करतांना दिसले. ना. पाटील यांनी तातडीने आपल्या ताफ्याला थांबवून अपघातग्रस्ताशी वार्तालाप केला. यात संबंधीत व्यक्तीला मुका मार लागल्याचे त्यांना दिसून आले. पालकमंत्र्यांनी तातडीने आपल्या ताफ्यातील वाहन देऊन संबंधीत व्यक्तीवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडून दिले
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, आदिवासी कोळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश सोनवणे व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment