कंपणी मधील कामगारांच्या न्याय हक्का साठी अखिल भारतीय छावा संघटणेच्या टीम चे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण
जळगांव जैन इरिगेशन सिस्टीम लि.,बांभोरी ता.धरणगांव जि.जळगाव येथे कायम स्वरुपी काम
करणाऱ्या कामगारांना कामावरुन कमी करण्यात आलेले असल्याने त्यांना न्याय मिळणेसाठी
जिल्हाधिकारी कार्यालय समोर अखिल भारतीय छावा संघटनेची टीम व कंपणी कामगार यांनी जिल्हाधिकारी कार्यांलय समोर आमरण उपोषण मांडले आहे
सविस्तर वृत्त..जळगांव जैन इरिगेशन सिस्टीम लि.,बांभोरी धरणगांव येथील कंपनीत जवळपास १० ते १२ वर्षापासून
काम करीत असलेल्या कामगारांना कंपनीकडून काहीएक कारण नसतांना कामावरुन कमी करण्यात
आलेले असल्याने त्यांचेसह संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे.याबाबत त्यांनी कंपनी
प्रशासनाकडे वारंवार विचारपूस केली असता त्यांना कंपनीकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे,तर
काही कर्मचाऱ्यांकडून कंपनी प्रशासनाने बळजबरीने राजीनामे लिहून घेतले आहेत. संबंधित कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कडे तक्रार केली होती,तसेच विविध प्रशाकीय कार्यालयात तक्रार करुण सुध्दा काहीएक उपयोग होत नसून संबंधित कामगारांना न्याय मिळलेला नसून कंपनी प्रशासनाकडून होत असलेला अन्याय दूर करणेसाठी शेवटचा पर्याय म्हणून आज दि. १९ ऑक्टोंबर रोजी अखिल भारतीय छावा संघटणेच्या टीम ने जिल्हाधिकारी कार्यलायाच्या प्रवेशाद्वाराजवळ आमरण उपोषण मांडण्यात आले आहे
कंपनीतून कमी करण्यात आलेले कर्मचारी त्यांचे कुटुंबासह तसेच छावा संघटणा टीम यांचेमार्फत आमरण उपोषण करण्यात आले असून संबंधित कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत न्याय व त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरुच राहणार असल्याचे छावा संघटणेच्या टीम नी म्हटले आहे
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment