ऐक दिवसीय ग्रामपंचायत बंद ला सरपंचांचा जाहीर पाठींबा
प्रतिनिधि .. नितीन इंगळे आज दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी राज्यातील सरपंच संघटना यांनी एक दिवसासाठी ग्रामपंचायत बंदची हाक दिली आहे आणि त्यामध्ये सर्व सरपंच सहभागी होत आहेत ग्रामपंचायतीच्या सरपंच च्या ग्रामसेवकांच्या एकत्रित विकास कार्यामध्ये भेडसावणाऱ्या समस्या त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सरकार दुर्लक्ष करत आहे या बाबीची दखल घेऊन सरपंच संघटनांनी आज ग्रामपंचायत बंदची हाक दिली आहे.निश्चितपणे गाव पातळीवर ग्रामपंचायतीमार्फत सरपंच आणि ग्रामसेवक यांना प्रचंड स्वरूपाच्या अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यावर उपाययोजना करताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सरपंचांनी कॉमन विषयावर एकत्रित पुकारलेल्या ग्रामपंचायती बंदला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डिएनई 136 जाहीर पाठिंबा देत असून सर्व सभासदांनी त्याचे अनुपालन करावे असे आवाहन राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे भविष्यात सुद्धा सरपंच संघटना ग्रामसेवक संघटना ग्रामपंचायत कर्मचारी संघटना एकत्रितपणे काही विषयावर लढा उभारणे गरजेचे आहे आणि त्याबाबत प्राथमिक स्तरावर बैठका झालेले आहेत.अंतिम स्वरुप दिल्यानंतर पुढील काही दिवसात लवकरच कालखंडात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.अशी अपेक्षा आहे सरपंचांच्या ग्रामपंचायत बंदला सर्व सरपंच आणि राज्यातील ग्रामसेवकांना ग्रामपंचायत बंद करन्याचे तातडीने निर्णय घेतलेला आहे तातडीने अनुपालन व्हावे ही अपेक्षा आहे. आणि राज्यातील ग्रामसेवक संघटनेचे सर्व सभासद सक्रियपणे सहभागी होतील याची संघटनेला खात्री आहे
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment