भुसावळ म.कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी यांना पाळधी ग्रामपंचायत तर्फे निवेदन
प्रतिनिधि ..नितीन इंगळे .. पाळधी परिसरातील शेती शिवारातील विजेची लोडशेडींग सुरू असून दिवसा लाईट बंद असते तर रात्रीच्या वेळेला लाईट सुरू राहतं असल्याने शेतकरी बांधव हे हवालदिल झाले आहे.शेतकरी बांधव यांनी पोटाच्या मुलाप्रमाणे पीक जगविले असून अपुऱ्या पाणी अभावी ते वाया जाण्याची चिंता असल्याने शेतकरी हे रात्रीच्या वेळेला शेतात जीवाची पर्वा न करता पिकांना पाणी भरणा करीत आहे.
पाळधी परिसरात शेती शिवारात रात्रीच्या वेळेला शेतकरी यांना बिबट्या,साप,विंचू यांच्यासह जंगली प्राणी यांच्यापासून जीवाला धोका असून देखील रात्रीच्या वेळेला पिकांना पाणी दिले जात आहे.
वरील सर्व बाबींचा महावितरण यांनी विचार करून पाळधी परिसरातील शेती शिवारातील विजेची लोडशेडींगची वेळ बदलविण्यासाठी पाळधी ग्रामपंचायत तर्फे भुसावळ येथील म.कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी माजी सरपंच कमलाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप सुशिर, देवचंद परदेशी, मनोज नेवे हे उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment