जामनेरात सायकल रॅली काढत इंधन दरवाढी विरोधात शिवसेना रस्त्यावर - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

जामनेरात सायकल रॅली काढत इंधन दरवाढी विरोधात शिवसेना रस्त्यावर

   प्रतिनिधि नितीन इंगळे                                                                                                                           जामनेर शहरात इंधण दर विरोधात शिवसेनेकडून सायकल रॅली काढण्यात आली स्वयंपाक घरातील गॅस असो की पेट्रोल, डिझेल इंधनाच्या वाढत्या किंमती या सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेल्या आहेत. पेट्रोल, डिझेल महागल्याने गाड्यांना बैल ; घोडे पुन्हा जुंपून रस्त्यावर उतरवण्याची वेळ केंद्र सरकारने आणली आहे. या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जामनेरात शिवसेना व युवा सेनेच्या वतीने सायकर रॅली रविवारी शहरभर काढण्यात आली.केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवा सनेने  आंदोलनाची रविवारी हाक दिली होती. युवा सेनेचे विश्वजीत राजे  यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर शहरात रविवारी सायकल रॅली काढली. यामध्ये शिवसेना पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.आज 115 रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. इंधन दरवाढ ही केंद्र सरकारच्या हातात असून हेच अच्छे दिन मोदी सरकार जनतेला दाखवत आहेत. याचा निषेध करण्यासाठीच आज हे आंदोलन करण्यात आल्याचे युवासेनेचे विश्वजीत राजे यांनी सांगितले. रॅलीतील बैलांना जुंपलेली मोटार, सायकलला जोडलेले मोटारसायकल चे भाग विशेष लक्ष वेधून घेत होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads