जागतिक अन्न दिवस लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल जामनेर येथे उत्साहात संपन्न - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

जागतिक अन्न दिवस लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल जामनेर येथे उत्साहात संपन्न

जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर दिनांक १६ ऑक्टोबर रोजी
 लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल जामनेर येथे जागतिक अन्न दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री.धनंजय सिंग सर यांनी भूषविले.  कार्यक्रमात विद्यार्थ्यानी घरून येतांना वेगवेगळे अन्न पदार्थ तयार करून आणले होते. त्यात पारंपरिक, आधुनिक, मसालेदार, चटपटीत आणि आरोग्यवर्धक  अन्न पदार्थाचा समावेश होता. या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन श्री. प्रमोद सोनार सर यांनी केले.श्री दत्ता देसले यांनी आहारातील पोषक घटकांचे महत्व या विषयी माहिती सांगितली. तसेच त्यांनी संतुलित आहाराचे महत्व विषद केले. या नंतर विद्यार्थ्यास श्री.दिपक राऊत सर यांनी ताजे अन्न पदार्थ,अन्न पदार्थाची पौष्टिकता वाढविण्याच्या पद्धती, ते टिकुन ठेवणे, साठविने या विषयीचे उपाय विद्यार्थ्यास सांगण्यात आले. तसेच जास्त शिजविलेले शिळे अन्न आरोग्यास कसे अपायकारक असते ते सांगण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads