असत्याचा नायनाट करणे पत्रकारांच्या हाती .....जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील
जीपीएस परिवारातर्फे विजया दशमी व पत्रकार सन्मान सोहळा संपन्न पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील शैक्षणिक परिवारातर्फे विजयादशमी चे औचित्य साधून रावणदहन व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक म्हणून पाळधी येथील विविध वृत्तपत्रांच्या पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला. वास्तववादी, सत्यदर्शी,निर्भीडपणे कार्य करणाऱ्या, समाज परिवर्तनाचे आणि प्रबोधनाचे मूळ आधार असण्याऱ्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यास जिल्हापरिषद सदस्य श्री प्रतापरावजी पाटील अध्यक्ष स्थानी होते.
समाजाच्या दोन्ही बाजू सत्कार आणि तिरस्कार दोन्ही स्वीकारून आपले कार्य निर्भिडपणे समाजापुढे मांडणाऱ्या पत्रकारांना GPS परिवारातर्फे शाल,पुस्तके व प्रथमोपचार पेटी देऊन सन्मानित करण्यात आले.मोनिका पाटील,आरती पाटील,अनिता पाटील,सचिन पाटील ह्या GPS परिवारातील सदस्यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.सन्मानार्थी मधून श्री भूषण माळी, श्री. गोपाल सोनवणे, श्री. सतीश शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.
श्री. महेश झवर,श्री विलास झवर,श्री.दीपक झवर, श्री. गोपाल सोनवणे, श्री.भूषण माळी, श्री.विवेक कुलकर्णी, श्री.भगवान मराठे, श्री. महेश मोरे,श्री.चेतन निंबाळकर, श्री. दिपक श्रीखंडे, श्री. सतीश शिंदे ह्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पाटील सर व दीपाली पाटील मॅम यांनी केले,आभार प्रदर्शन सचिन भालेराव सरांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी GPS परिवारातील मुख्याध्यापक,प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहकार्य केले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment