आजपासून प्रिकॉशन डोसला सुरुवात कचरूलाल बोहरा यांनी घेतला तालुक्यातील प्रथम प्रिकॉशन डोस.*दोन दिवसात करणार उद्दिष्ट पूर्ण - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

आजपासून प्रिकॉशन डोसला सुरुवात कचरूलाल बोहरा यांनी घेतला तालुक्यातील प्रथम प्रिकॉशन डोस.*दोन दिवसात करणार उद्दिष्ट पूर्ण


प्रतिनिधि .. नितीन इंगळे
जिल्हाधिकारी अभिजित राऊत,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व वय वर्षे ६० वरील सहव्याधी असलेले नागरिक यांच्या प्रिकॉशन डोसला आज सुरवात करण्यात आली.
जामनेर तालुक्यात कचरूलाल बोहरा यांना ६० वर्षांवरील नागरिकांचा पहिला  प्रिकॉशन  डोस देण्यात आला. प्रथम प्रिकॉशन डोस घेतल्याबद्दल मुख्याधिकारी नगरपालिका जामनेर चंद्रकांत भोसले यांच्याकडून बोहरा यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, डॉ.हर्षल चांदा,मुख्याधिकारी नगर पालिका चंद्रकांत भोसले,वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.सागर पाटील,गटनेते न.पा. जामनेर डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक सुहास पाटील,सुहास चौधरी,तालुका मलेरिया पर्यवेक्षक  व्ही.एच.माळी,आरोग्य साहाय्यक पुंडलिक पवार, सुनील पाटील,आरोग्य सेविका कविता नवघरे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व ६० वर्षे वरील सह व्याधी असलेल्याना दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असतील अशा लाभार्थींना च प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे.
अशा लाभार्थ्यांना कोव्हीन सिस्टीम मधून प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबर वर एस एम एस प्राप्त होणार आहे.
पूर्वी नोंदणी न केलेल्या हेल्थ केयर वर्कर्स फ्रंट लाईन वर्कर्स यांना विहित नमुन्यात नोकरी च्या ठिकाणचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
जामनेर तालुक्यात एकूण 1586 हेल्थ केयर वर्कर्स,3019 फ्रंट लाईन वर्कर्स व 25314 साठ वर्षे वा अधिक वयाच्या सहव्याधी असलेल्या लाभार्थींना प्रिकॉशन डोस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी दिली.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads