नाशिक विभागाचे म्हाडा सभापती तथा संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव ढवळे यांच्या वतीने एकलव्य संघटनेची नियुक्ती - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

नाशिक विभागाचे म्हाडा सभापती तथा संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव ढवळे यांच्या वतीने एकलव्य संघटनेची नियुक्ती

   प्रतिनिधि ... नितीन इंगळे                                       एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष व नाशिक विभागाचे म्हाडा सभापती श्री शिवाजीराव ढवळे,जळगाव जिल्हाध्यक्ष बापू पूना मोरे,प्रदेश उपाध्यक्ष अंकूर भाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली एकलव्य संघटनेची नियुक्ती करण्यात आली.
यानुसार 23/12/2021 ते 23/12/2022 पर्यंत महाराष्ट्र राज्य खान्देश विभाग व जळगाव जिल्हा संघटनेच्या अटी व शर्तीस नियुक्ती ला मान्यता देण्यात आली आहे.
या उद्देशाने एकलव्य संघटनेची नियुक्ती व कार्यकारिणी आज रोजी जामनेर येथील रेस्ट हाऊस येथे करण्यात आली.
कार्यक्रमात नियुक्ती च्या पदा ठिकाणी वाकी खुर्द चे लोकनियुक्त सरपंच श्री. सुधाकर गंगाराम सुरवाडे तसेच
सरपंच वाकी खुर्द उपसरपंच
श्री.ईश्वर बाबूलाल तेली यांच्या हस्ते नाशिक विभाग आणि
म्हाडा सभापती मा.श्री शिवाजी राव ढवळे साहेब
यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
संघटनेच्या जिल्हा कमिटीने सुद्धा एकलव्य संघटनेचे अभिनंदन केले आहे.
याठिकाणी नियुक्ती झालेली सदस्यांची नावे खालील प्रमाणे १)सुनिल नाईक उत्तर विभाग जळगाव जिल्हाध्यक्ष,२)प्रकाश नाईक जामनेर तालुकाध्यक्ष,३)प्रविण वंसत ठाकरे उपतालुकाध्यक्ष,४)करण प्रकाश माळी युवाध्यक्ष,५)श्याम अंबादास भिल एकुलती नाचणखेडा गट प्रमुख,६)रुतिक मुकेश चव्हाण तालुका युवाध्यक्ष,७)रविंद्र केशव भिल सचिव,८)रविंद्र शिवाजी भिल तालुका कार्याध्यक्ष,९)अमोल प्रकाश माळी तालुका संघटक पदी निवड करण्यात आली असून उपस्थित दैनिक वाँईस आँफ इंडिया चे प्रतिनिधी मिलिंदआप्पा लोंखडे,महाराष्ट्र माझाचे उपसंपादक शांताराम झाल्टे, एकलव्य संघटना महिला आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads