कोळी समाजाने एकत्र येऊन कार्य करावेः- विनोद पाडोळसे - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

कोळी समाजाने एकत्र येऊन कार्य करावेः- विनोद पाडोळसे



 प्रतिनिधि ... नितीन इंगळे 
 तळेगाव ता. जामनेर ता.१२ महर्षी वाल्मिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोळी समाजाने एकसंघ होऊन कार्य करावे असे प्रतिपादन   प्रवर्तन बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विनोद पाडळसे यांनी केले आहे.  महर्षी कोळी समाज बांधवांनी संघटित होऊन आपले प्रश्न सोडवावेत व परिवर्तन चळवळ पुढे न्यावी. कोळी समाजाने सामाजिक ताकद दाखवण्याची गरज असल्याचे परखड मत तळेगाव येथे आयोजित महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात निमित्त विनोद पाडळसे यांनी मांडले आहे. महर्षी वाल्मिक कोळी समाज मंडळामार्फत महर्षी वाल्मिक जयंती आयोजित केली. यावेळी विनोद पाडळसे बोलत होते.सामाजिक कार्यकर्ते आत्माराम कोळी व  ग्यानदेव कोळी यांच्या हस्ते महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कोळी समाज अध्यक्षः- धनराज कोळी, उपाध्यक्ष  संदीप कोळी, सचिव कौतिक कोळी, सामाजिक कार्यकर्ते विनोद पाडळसे, विकास कोळी, गोपाल कोळी, दिलीप कोळी, कैलास कोळी, रमेश कोळी, अर्जुन कोळी, दत्तू कोळी, शिवाजी कोळी,सह समाजबांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads