चक्क चोराने अंगणवाडीच्या लहान मुलांच्या पोषणआहार वर मारला डल्ला - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

चक्क चोराने अंगणवाडीच्या लहान मुलांच्या पोषणआहार वर मारला डल्ला

                                                                           
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे
 जामनेर - तालुक्यातील देऊळगाव गुजरी इथे असलेल्या अंगणवाडीमध्ये नेहमीप्रमाणे लहान मुलांचे पोषण आहार   धान्य अंगणवाडीच्या हॉल मध्ये ठेवण्यात आले होते दिनांक 9. ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान अंगणवाडी सेविका अंगणवाडीत आल्या असताना त्यांना अंगणवाडीतील हॉलच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचा प्रकार डोळ्यासमोर आला त्यानंतर त्यांनी ताबडतोब ग्रामपंचायत सरपंच कर्मचारी व इतर गावातील नागरिकांना सांगून तो प्रकार सर्वांनी पाहीला असता चोरट्यांनी गहू, चना डाळ, व साखर अशा मौल्यवान वस्तू अंगणवाडीच्या हॉल मधून गायब झाल्याचा  प्रकार उघडकीस आला आहे या आधी सुद्धा एकदा असाच प्रकार अंगणवाडीमध्ये घडलेला असून यासंदर्भात अंगणवाडीच्या सेविकांनी घडलेला सर्व प्रकार वरिष्ठांकडे सांगून पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविण्यात आली आहे
Previous article
Next article
This Is The Oldest Page

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads